CoronaVirus News: पुणे विभागात ५६१ नवीन रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 05:16 IST2020-06-15T05:15:29+5:302020-06-15T05:16:00+5:30
बाधितांची संख्या १५ हजार १९८ वर

CoronaVirus News: पुणे विभागात ५६१ नवीन रुग्णांची भर
पुणे/सातारा/सांगली : पुणे विभागात रविवारी एका दिवसात तब्बल ५६१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे आतापर्यंत विभागात बाधितांची संख्या १५ हजार १९८ वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत ९ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९६५ आहे. रविवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात ७२६ बाधित असून ४९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १९६ आहे. ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५९ बाधित असून ८६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ६४७ आहे. १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात २१६ बाधित असून ११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९५ आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ७२० बाधित असून ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९६ आहे. ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.