बारामती: यंदा सर्वच सणांंवर कोरोनाचे सावट आहे. त्याला गौरी गणपती देखील अपवाद नाही.या संकटातुन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी जीवाची बाजी लावली आहे.यामध्ये डॉक्टर,पोलीस,परिचारिकांचा समावेश आहे. मंगळवारी (दि.२६) गौरीची आरास करताना कोरोना योद्ध्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. शहरातील एका कुटुंबाने गौरी डॉक्टरच्या वेशात अवतरल्याचा घरगुती देखावा सादर केला आहे. तर काहींनी गौरीला डॉक्टर,पोलिसांचा वेष परिधान करत कोरोना योद्ध्यांना देवाचा दर्जा देऊ केला आहे. बारामती शहरात येथे गौरी गणपती सजावटीच्या माध्यमातून महिलांनी कोरोना जनजागृती केली आहे. कोरोना जनजागृतीचे देखावे कौतुकाचा विषय ठरले आहे. कोरोनामुळे साधेपणाने गौरी सजावट, आरास करण्यात आल्याचे चित्र आहे.सजावटीसह स्त्रीभ्रूण हत्या, पाणी वाचवा, पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक संदेशांनी आरास सजली आहे. शहरातील कमल अविनाश भापकर यांनी गौराई डॉक्टरच्या रुपात अवतरल्याचा देखावा सादर केला आहे.त्यामुळे कोरोनापासुन सर्व सामान्यांना वाचविणाऱ्या महिला डॉक्टरांना देवाचे स्थान असल्याचा संदेश या निमित्ताने भापकर यांनी दिला आहे. कोरोना हारेगा,भारत जीतेगा, असा देखील संदेश त्यांनी दिला आहे. जंक्शन (ता. इंदापुर) येथील तृप्ती अनंता कार्वेकर यांनी पोलीस,डॉक्टरच्या रुपात अवतरल्याचा देखावा सादर केला आहे. कोरोना योद्ध्याचे महत्व जणु यातुन अधोरेखित करण्यात आले आहे.तसेच बारामतीच्या सुनीता जगताप यांनी नियमांचे पालन करा,कोरोना टाळा.मास्क,सॅनिटायझरचा वापर करा,हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, अशा फलकाद्वारे सामाजिक संदेश दिला आहे.
कोरोना योद्ध्यांचा असाही सन्मान; बारामतीत डॉक्टरच्या वेशात अवतरल्या गौराई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:59 IST
कोरोना हारेगा,भारत जीतेगा असा दिला संदेश..
कोरोना योद्ध्यांचा असाही सन्मान; बारामतीत डॉक्टरच्या वेशात अवतरल्या गौराई
ठळक मुद्देबारामती येथे गौरी गणपती सजावटीच्या माध्यमातून महिलांनी कोरोना जनजागृतीसजावटीसह स्त्रीभ्रूण हत्या, पाणी वाचवा,पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक संदेशांनी आरास