शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टेमघर' दुरुस्तीला कोरोनाचे विघ्न; यंदाही धरण दुरूस्तीचे काम अपूर्ण राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:00 IST

गेल्या काही वर्षांपासून टेमघर धरण दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण..

ठळक मुद्देएप्रिल 2020 मध्येच धरणाच्या दुरुस्तीचे काम शंभर टक्के पूर्ण होण्याची होती अपेक्षा  खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा

राहुल शिंदे -

पुणे :  टेमघर धरण दुरुस्तीच्या कामात कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे यंदाही धरण दुरूस्तीचे काम अपूर्ण राहणार आहे.परिणामी पुन्हा दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ घ्यावी लागणार आहे.तसेच फेब्रुवारी -मार्च  २०२१ मध्ये धरण रिकामे करावे लागणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले .परंतु, गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.मात्र सुमारे दोन-अडीच वर्षांपासून धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली होती. त्यामुळे एप्रिल 2020 मध्येच धरणाच्या दुरुस्तीचे काम शंभर टक्के पूर्ण होण्याची अपेक्षा होती. खडकवासला धरण प्रकल्पातील महत्त्वाचे धरण आणि पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणा-या टेमघर धरणाची दुरुस्ती लवकर व्हावी यासाठी जलसंपदा विभागाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, धरणाच्या दुरुस्तीला वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे धरण दुरुस्तीचे काम रखडले आहे.जलसंपदा विभागातर्फे यंदा 28 फेब्रुवारी रोजी टेमघर धरण दुरुस्तीच्या कामासाठी शंभर टक्के रिकामे करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार होते. परंतु ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी व लोक डाऊनमुळे धरण दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. सुमारे एक महिना दुरुस्तीचे काम पूर्णपणे बंद ठेवावे लागले. मात्र, अत्यावश्यक काम असल्याने शासनाच्या परवानगीने ३३ टक्के कर्मचारी घेऊन फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. काम सुरू झाले तरी काम करताना पेट्रोलचा तुटवडा भासू लागला.तसेच दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे केमिकल मुंबईत अडकून पडले होते, यातून मार्ग काढत धरणाच्या ग्राऊटींगचे काम पूर्ण करण्यात आले. शॉर्ट फिटचे 70 टक्के कामही पूर्ण झाले आहे. तसेच मे महिना अखेरपर्यंत आणखी काही कामे पूर्ण केली जाणार आहेत.-----------  खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण पूर्णपणे रिकामे करावे लागते. त्यामुळे उर्वरित तीन धरणांमधील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. 2019 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे पुणेकरांना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळीही धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस