शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोरोनामुळे अभ्यासक्रम, अध्यापन, रोजगारही बदलणार; ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 3:03 AM

कोविड बॅच म्हणून विद्यार्थ्यांवर ठपका बसू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरे जावे, असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुण्यातील नामांकित शैैक्षणिक संस्थांच्या प्रमुख्यांशी झालेल्या चर्चेतून मंगळवारी उमटला.

पुणे : कोविडनंतर सुरू होणाऱ्या शैैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करावा लागणार आहे. आॅनलाइन शिक्षणासाठी अत्याधुनिक ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. परदेशात जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केलेल्या भारतीय विद्यापीठांमध्येच शिक्षण घ्यावे लागेल. कोविड बॅच म्हणून विद्यार्थ्यांवर ठपका बसू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरे जावे, असा सूर ‘लोकमत’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुण्यातील नामांकित शैैक्षणिक संस्थांच्या प्रमुख्यांशी झालेल्या चर्चेतून मंगळवारी उमटला.‘लोकमत’तर्फे ‘कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण - आव्हाने संधी व कल’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजित कदम, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड, सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार सहभागी झाले होते.अंतिम वर्षाची परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून दोन किंवा तीन शिफ्टमध्ये. विद्यार्थ्यांची घराजवळील महाविद्यालयात परीक्षा देणे शक्यशिक्षकांना ‘ब्लेंडेड’ पद्धतीने शिकवावे लागेल. विद्यार्थी काही भाग वर्गात तर काही भाग आॅनलाइन पद्धतीने घरी किंवा वसतिगृहात थांबून शिकतील.-नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठआॅनलाईन शिक्षणातही शिक्षक-विद्यार्थी संवाद वाढावाशिक्षकांना हवे अद्ययावत ज्ञान; अन्यथा काही शिक्षक बाहेर फेकले जातील.- डॉ. पी. डी. पाटील,कुलगुरू, डी. वाय. पाटील विद्यापीठविद्यार्थ्यांनी आता परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक करार केलेल्या भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घ्यायला हवे.सर्वच शिक्षण संस्थांनी स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंग, वर्गातील विद्यार्थ्यांच्या बैैठक व्यवस्थेबाबत एकत्र येऊन नियमावली तयारकरायला हवी.- डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका व प्र-कुलगुरू,सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठआॅनलाइन अभ्यासक्रमांचे मूल्यांकन नॅक, एनबीए धर्तीवर व्हावेमेडिकल व इंजिनिअरिंग आॅनलाईन शिक्षणासाठी मार्ग शोधावे लागतील.परीक्षांबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली जाईल.- डॉ. विश्वजित कदम,सचिव व प्र-कुलगुरू,भारती विद्यापीठपूर्ण कंपनी डिजिटल करण्यासंदर्भातील डिजिटल ट्रान्फॉर्मेशन मॅनेजर, आॅनलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट अशा स्वरूपाचे काम करणारे मनुष्यबळ लागेल.गेमिंग क्षेत्रातील संधी वाढेल. तसेच फायनान्स रिटेल, कॉन्टम कंप्युटिंग, डेटा सायन्स आदी क्षेत्रांतही नवीन रोजगार निर्माण होतील.- डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू,सिम्बायोसिस कौशल्य वव्यावसायिक विद्यापीठदेशात येणाºया नवीन कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळासाठी शिक्षणविद्यार्थी, शिक्षणसंस्थांना वेग्ळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय द्यावा. शासनाने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला पाहिजे.- डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ- लोकमत यू-ट्यूब चॅनेलवर हा वेबिनार पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :Educationशिक्षण