Corona virus : येरवडा वाहतूक पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:30 IST2020-10-27T19:31:26+5:302020-10-27T20:30:35+5:30
श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना केईएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले..

Corona virus : येरवडा वाहतूक पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
पुणे : येरवडा वाहतूक विभागातील पोलीस हवालदार पांडुरंग गोविंद घुले(वय ५६ ) यांचे सोमवारी सकाळी केईएम हॉस्पिटल येथे निधन झाले. कोरोना झाल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हवालदार पांडुरंग घुले यांची २४ सप्टेंबर रोजी कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर विमाननगर कोविड सेंटर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना केईएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. कोरोनामुळे त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. मात्र संसर्ग वाढल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मांजरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.