शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Corona virus : अजून आम्ही थकलो नाही..कारण अजून आम्ही कोरोनाविरुद्ध जिंकलेलो नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:05 IST

रेड झोनमधील पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुन्हा कर्तव्यावर हजर 

ठळक मुद्देपोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना

पुणे : कोरोना विषाणूने पुणे शहरातील काही भागात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानून पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत नाकाबंदी करीत कर्तव्य करीत आहेत, मात्र जीव धोक्यात घालून 'रेड झोन' मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांची सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या लायगुडे दवाखान्यात (कोवीड केअर सेंटर) घशातील द्रव घेऊन तपासणी करण्यात आली. त्या पंधराही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दरम्यान दवाखान्यातून कर्तव्यावर हजर राहण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून मानवंदना दिली.  चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केलेला आहे. या जीवघेण्या विषाणूच्या आजाराची लक्षणं असलेले रुग्ण पुण्यातही रोजच आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, पोलिसही नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रत्येक पावले उचलत आहेत, जेणेकरुन संसर्ग पूर्णपणे टाळता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच जीव धोक्यात घालून पोलीस रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करीत आहेत. शहरातील रेड झोनमधील नाकाबंदीदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांशी अथवा संशयित व्यक्तींशी पोलिसांचा थेट संपर्क होत असल्याने झोन तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दत्तवाडी व पर्वती विभागातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोवीड ची चाचणी करण्यासाठी त्यांना सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात दाखल करून त्यांच्या घशातील द्रव घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर राहण्यासाठी गेले. दरम्यान त्यांना दवाखान्यातून निरोप देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी शाह व औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप यांनी कम्युनिटीमध्ये काम करताना पोलिसांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले.  

................................

पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना..कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्र पोलीस महत्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडत आहेत. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, तसेच त्यांना कोरोना विषाणूपासून रोखण्यासाठीच सध्या पोलीस रस्त्यावर उतरले आहोत. शहरातील काही पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने एका पोलीस ठाण्यातील संपूर्ण स्टाफ नुकताच क्वारंटाईन करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत हॉस्पिटलमधील काही बेड पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.तसेच नाकाबंदीदरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल