शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Corona virus : कोरोनामुळे पुण्यात महसूलचे पाच महिन्यांपासून हजारो दावे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:30 IST

पुणे जिल्ह्यात दर वर्षी दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या आणि प्रलंबित दाव्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.

ठळक मुद्दे- अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 हजार 918 प्रकरणे प्रलंबित येत्या 1 ऑगस्ट पासून सुनावण्या घेण्याचे आयुक्त आदेशअतिरिक्त जिल्हाधिकारी पद तीन महिन्यांपासून रिक्त दाव्यांची संख्या लक्षात घेता शासनाला देखील हे पद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य होणार नाही.

पुणे : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महसूल विभागाचे हजारो दावे प्रलंबित असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 हजार 918 प्रलंबित महसुली दावे प्रलंबित आहे. यामुळेच आता येत्या 1 ऑगस्टपासून सुनावण्या घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. 

पुणे शहरामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मार्च अखेर पर्यंत रुग्ण संख्ये मोठी वाढ झाली. त्या शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर 24 मार्चनंतर बहुतेक सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळेच पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे घेण्यात येणाऱ्या महसुली दाव्यांच्या सुनावण्या ठप्प झाल्या. तालुकास्तरावर तहसिलदार, प्रात अधिकारी यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केले जातात. यामध्ये प्रामुख्याने फेरफार मधील चुका दुरूस्ती, कुळाच्या नोंदी, रस्ता, पाणंद रस्ते, सातबातील चुका आदी संदर्भातील हे दावे असतात. ग्रामीण भागातील शेतकरी , सर्वसामान्य नागरिक तलाठी, सर्कल ने केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी वर्षांनो वर्ष महसूल दरबारी हेलपाटे मारत असतात.

पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन पध्दतीने महसुली प्रकरणांच्या सुनावण्या घेण्यास सुरूवात केली होती. पंरतु यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागले. दावे दाखल करणारे बहुतेक लोक ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील असल्याने देखील न लाईन सुनावणी घेणे आवघड जात होते. यामुळे ऑनलाईन सुनावणीचा प्रयोग देखील बंद पडला. यामुळेच आता नागरिकांची मागणी वाढू लागल्याने येत्या 1 ऑगस्टपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. ----अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित महसुली दावे वर्ष        प्रलंबित दावे 2012        042013        142014        282015        572016        2142017      6262018     8822019     8762020    216-----दिवसाला सरासरी 30 सुनावण्या घेण्याचे नियोजन पुणे जिल्ह्यात दर वर्षी दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या आणि प्रलंबित दाव्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यामुळेच कोरोना पुर्वी दिवसाला सरासरी 100 ते 120 प्रकरणाची सुनावणी घेतली जात होत्या. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यासाठी दिवसाला सरासरी 30 सुनावण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर जोशी यांनी सांगितले . ----अतिरिक्त जिल्हाधिकारी पद तीन महिन्यांपासून रिक्त पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या आकस्मिक निधनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. पुण्यातील प्रलंबित दाव्यांची संख्या लक्षात घेता शासनाला देखील हे पद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य होणार नाही. यामुळे आता शासनाकडून या पदावर लवकरात लवकर नियमित अधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. --- 

 

टॅग्स :PuneपुणेRevenue Departmentमहसूल विभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस