शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
3
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
4
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
5
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
6
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
7
"पाकव्याप्त काश्मीर आपलं नाही, ती परकीय भूमी"; पाकिस्तानची मोठी कबुली
8
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
9
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
11
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
12
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
13
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
14
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
15
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
16
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
17
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
18
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
19
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
20
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय

Corona virus : पुण्यातील ‘कंटेन्मेंट झोन’ होणार पूर्णपणे सील; महापालिकेकडून काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:25 PM

झोनमध्ये ये-जा करण्यास मोकळीक मिळत आहे, तो भाग व रस्ता पत्रे लावून सील करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहरातील कंटन्मेंट झोनची पुनर्रचना करून पूर्वीचे २७ कंटन्मेंट झोन रद्द; नवीन २८ झोन

पुणे : कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असलेला भाग हा ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहिर करताना, तो पूर्णपणे सील केला पाहिजे असे आदेशातच नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्या झोनमध्ये ये-जा करण्यास मोकळीक मिळत आहे, तो भाग व रस्ता पत्रे लावून सील करण्यात येत आहे. जर हा भाग सील केला गेला नाही तर,कंटेन्मेंट झोनचा मुळ उद्देश सफल होणार नाही. त्यामुळेच सध्या नवे झोन पूर्णपणे सील करण्याचे काम शहरात सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.     शहरातील कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करून पूर्वीचे २७ कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले असून, नवीन २८ झोन केले गेले आहेत. परंतु, यातील काही झोनमध्ये आतील बाहेरील नागरिकांची ये-जा होत असल्याचे निदर्शनास आल्याने, तो भाग पूर्णपणे सील करण्याचे काम गेली दोन दिवस शहरात चालू आहे.कंटन्मेंट झोनमध्ये व्यापारी भाग स्वतंत्ररित्या खुला करता येत नसून, कंटन्मेंट झोन मध्ये ब्रेक करणे ही सध्या मोठी अडचण ठरत आहे़. उदाहरणार्थ, मुख्य शिवाजी रस्ता जर बंद केला नाही तर, २९ ठिकाणी बॅरिगेटस् लावावे लागत आहे. त्यामुळे कंटन्मेंटच्या सीमा रेषेवरील दुकानेच सुरू राहू शकतील. आपला मुळ उद्देश हा कंटन्मेंट झोनमधील पॉझिटिव्ह रूग्ण कमी करणे हा असून, काही दिवस तरी कंटन्मेंट भागातील मार्केट किंवा व्यापारी संकुल (जेथे रहिवास नाही अशी ) खुली होऊ शकणार नाहीत.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ज्या सूचना व मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक सवलती अथवा त्या मर्यादेपेक्षा खाली जाऊन आपण निर्णय घेऊ शकत नाही. पण स्थानिक परिस्थिती पाहून या सवलती न देता अधिक कडक निर्णय घेऊ शकतो. त्यानुसारच सध्या तरी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रूग्ण आपण घरी सोडत नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. -----------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिसMayorमहापौर