शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 22:02 IST

येरवड्यातील मृतांची संख्या झाली आता चार

ठळक मुद्देकृपया घराबाहेर पडू नका प्रशासनाचे आवाहनयेरवड्यातील वाढत्या रुग्णांच्या संख्येबाबत प्रशासनाने सतर्कतेचे आदेश प्रशासनाकडून रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच संपकार्तील व्यक्ती यांच्यावर तपासणी उपचार सुरू

पुणे: कोरोना आजाराचा शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असून येरवडा विभागात कोरोनाचे ८५ हून अधिक रुग्ण आढळले असून गुरुवारी सकाळी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. येरवड्यातील मृतांची संख्या आता चार झाली असून त्यामुळे येरवड्यातील धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. येरवड्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून नागरिक मात्र अजूनही गंभीर झालेले दिसत नाहीत. येरवड्यातील वाढत्या रुग्णांच्या संख्येबाबत प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत.  येरवडा परिसरात दाट लोकवस्तीचा परिसर असून लक्ष्मीनगर सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. आतापर्यंत चार लोकांनी या गंभीर आजारामुळे आपला जीव गमावला आहे. प्रशासनाकडून रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच संपकार्तील व्यक्ती यांच्यावर तपासणी उपचार या सर्व गोष्टी सुरू आहेत. आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केली असताना देखील नागरिक अजूनही गंभीर झालेले दिसून येत नाहीत. या परिस्थितीत देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर भाजी विक्री व इतर अनावश्यक गोष्टी करताना दिसून येत आहेत. स्थानिक पातळीवर नागरिक संचारबंदी काळातही घरात न थांबता अनावश्यकपणे रस्त्यावर येत आहेत. काही वस्त्या व सोसायट्यांमध्ये इतर परिसरातील नागरिक नातेवाईकांकडे लपून छपून वास्तव्य करत आहे. येरवड्यातील आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. याबाबत वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे म्हणाले, येरवडासह संपूर्ण शहराची परिस्थिती ही दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व तपासण्या व उपचार सुरू आहेत. घरीच थांबून अनावश्यक बाहेर न पडता सोशल डिस्टन्ससिंगचे  काटेकोर पालन करत आपली व आपल्या कुटुंबाची तसेच परिसराची काळजी घ्यावी. येरवडा परिसरात वाढती रुग्ण संख्या ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टिंगरे यांनी केले आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस