शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

Corona virus : रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' आलाय, तुम्हीच करा तुमची सोय, पुण्यातील खासगी लॅबमधील भेदक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 11:33 IST

रुग्णांनाच करावी लागतेय धावपळ

ठळक मुद्देपुण्यात ८ शासकीय व १४ खासगी लॅब मध्ये होते रुग्ण तपासणी

पुणे : खासगी लॅबमध्ये कोविड टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांनाच आपली सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. खासगी लॅब व महापालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांशी संपर्क साधून त्यांना विलगीकरण किंवा रुग्णालयात भरती करण्यामध्ये प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. फोन येण्याआधीच काही रुग्ण स्वत:हून दाखल होत आहेत. तर काहींना चौकशीचा फोनही येत नसल्याचा अनुभव येत आहे.

पुणे शहरामध्ये आठ शासकीय व १४ खासगी लॅबमध्ये कोविड नमुन्यांची तपासणी केली जात आहे. सध्या दररोज सहा हजारांहून अधिक नमुने तपासले जात आहेत. खासगी लॅबमध्येही दररोज शेकडो टेस्ट होत आहेत. लॅबकडून वेळेत रुग्णांची माहिती दिली जात नसल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी गुरूवारीच स्पष्ट केले आहे. वेळेत रुग्णांची माहिती मिळत नसल्याने त्यांची बैठकही घेतली जाणार आहे. याचअनुषंगाने खासगी लॅब व महापालिकेतील समन्वयाचा अभाव असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्य महिलेने ताप येत असल्याने खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले. मग त्या स्वत: ओळखीच्या माध्यमातून खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना दुसºयादिवशी महापालिकेतून चौकशीचा फोन आला. पण रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितल्यानंतर फोन ठेवण्यात आला. त्यांच्या घरातील पती व मुलाने दुसºया दिवशी त्याच लॅबमध्ये टेस्ट केली. दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. दुसºया दिवशी त्यांनीही नवले व अन्य काही रुग्णालयांमध्ये चौकशी केली. मग शेजारील रहिवाशांनीच त्यांचे अहवाल सिंहगड कोविड सेंटरवर दाखवून औषधे आणली. तोपर्यंत महापालिकेकडून त्यांची विचारणा झाली नव्हती. तसेच रहिवाशांनी विनंती केल्यानंतर इमारतीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले.------------दांडेकर पुलाजवळील एका ज्येष्ठ नागरिकानेही जवळच्या रुग्णालयात चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मुलाने आता पुढे काय? असे रुग्णालयात विचारले. त्यांनी महापालिकेकडून दुरध्वनी येईल, असे सांगितले. दुसºया दिवशी सकाळपर्यंत त्यांनी दुरध्वनीची वाट बघितली. पण संपर्क साधण्यात न आल्याने मुलाने स्वत:हून हेल्पलाईनवर संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर त्यांना सिंहगड कोविड सेंटरला जायला सांगितले. तिथे मग होम आयसोलेशनचा फॉर्म भरण्यात आल्याची माहिती मुलाने दिली.---------------------------डॉक्टरच सांगतील...काही खासगी लॅबमध्ये चौकशी केल्यानंतर ‘चिठ्ठी दिलेल्या डॉक्टरांकडूनच घरीच राहायचे की रुग्णालयात जायचे याबाबत सांगितले जाईल, आम्ही फक्त टेस्ट करून त्याची माहिती महापालिकेला कळवितो. त्यांच्याकडूनच फोन येईल’ अशी उत्तरे मिळाली. -------------------खासगी लॅबकडून ई-मेलद्वारे दररोज माहिती दिली जाते. त्यामध्ये रुग्णाचा मोबाईल क्रमांकही असतो. त्यावर रुग्णाशी संपर्क साधून बोलावून घेतले जाते. चिठ्ठी घेतलेल्या खासगी डॉक्टरांकडूनही रुग्णांना माहिती दिली जाते.- संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका-------------------

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्तMayorमहापौरAjit Pawarअजित पवार