पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर नागरिक घाबरुन जातात. त्यात लोकांकडून अनेक बाबी ऐकण्यात आल्याने त्यांचा धीर खचून जातो, अशावेळी त्यांचे समुपदेशन करुन त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी नवी ताकद देण्याचा प्रयत्न पुणेपोलिसांच्या मनोभरोसा या उपक्रमातून करण्यात येणार आहे.पुणे पोलीस दलातील जवळपास २६९ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १८५ पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. या कर्मचार्यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील कोरोना रुग्णांना करुन देण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी मनोभरोसा हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत एक कार्यशाळा सोमवारी पोलीस आयुक्तालयात झाली. यामध्ये कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले ३५ कर्मचारी आणि ज्ञानप्रबोधिनीचे ३० समुपदेशक सहभागी झाले होते.
Corona virus : कोरोनातून बरे झालेले पोलीस करणार रुग्णांचे समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 18:18 IST
पुणे पोलीस दलातील जवळपास सव्वा दोनशे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण
Corona virus : कोरोनातून बरे झालेले पोलीस करणार रुग्णांचे समुपदेशन
ठळक मुद्देपुणे पोलिसांचा 'मनोभरोसा' उपक्रम : ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्य१७७ पोलीस अधिकारी व कर्मचारी हे बरे झाले आहेत पूर्णपणे