शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus in pune : चिंताजनक! पुण्यात बुधवारी सर्वाधिक ४६० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:34 IST

कोरोना बाधितांची संख्या १० हजार ६४३

ठळक मुद्दे पुणे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१३ वर शहरातील एकूण मृत्यूचा आकडा ४८१ इतका

पुणे: पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ४६० नवीन रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ११७ इतकी आहे. पुणे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१३ वर जाऊन पोहचली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २ हजार ८४१ जणांचे स्वब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. तर शहरात १२ जणांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. शहरातील एकूण मृत्यूचा आकडा ४८१ इतका झाला आहे. ९ मार्चपासून कालपर्यंत कोरोना बाधितांची संख्या १० हजार ६४३ इतकी झाली आहे. यापैकी अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजार ४३९ इतकी आहे.

........................................

पिंपरीत चोवीस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून चोविस तासांत ४९ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा झाली आहे. आजअखेर १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे मोशीतील ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दिवसभरात शहरातील ४३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये २८ पुरुष आणि १५ महिलांचा समोवश आहे. या रूग्णांवर महापालिकेच्या यशवंतरा चव्हाण स्मृती रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण अधिक आहे. आज आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगाव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एमबी कॅम्प किवळे, खंडोबामाळ, दिघीरोड भोसरी, दत्त मंदिर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ३८ जणांना  घरी सोडले. आजपर्यंत १३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ५१३  सक्रीय रूग्णांवर  उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील एकूण बाधितएकूण बाधित संख्या - १३२३५ पुणे शहर- १०७४४ पिंपरी चिंचवड- १३१६कॅन्टोन्मेंट व ग्रामीण - ११७५ मृत्यू- ५४०

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामshravan hardikarश्रावण हर्डिकर