Corona virus in Pune : Today 808 corona patient discharg, Total recovered patient number 16 thousands 996 | Corona virus in Pune : पुणे शहरात शनिवारी तब्बल ८०८ जणांना 'डिस्चार्ज',आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ९९६

Corona virus in Pune : पुणे शहरात शनिवारी तब्बल ८०८ जणांना 'डिस्चार्ज',आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ९९६

ठळक मुद्दे४६१ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनीवारी ८२७ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २६ हजार ९०४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८०८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४६१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ९ हजार ९२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

शनिवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८२७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३९७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात शनीवारी १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८१६ झाली आहे. दिवसभरात एकूण ८०८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ५७२ रुग्ण, ससूनमधील १९ तर  खासगी रुग्णालयांमधील २१७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ९९६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ९ हजार ९२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५११ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ८८७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus in Pune : Today 808 corona patient discharg, Total recovered patient number 16 thousands 996

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.