Corona Virus Pune News: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा नवा रेकॉर्ड; शनिवारी संख्या पोहचली दहा हजार पार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 20:44 IST2021-04-03T18:53:18+5:302021-04-03T20:44:25+5:30

Corona virus pune : पुणे शहरात शनिवारी तब्बल ५ हजार ७२० रूग्णांची वाढ...

Corona Virus Pune News: Worrying! New record of corona outbreak in Pune district; On Saturday the number reached ten thousand | Corona Virus Pune News: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा नवा रेकॉर्ड; शनिवारी संख्या पोहचली दहा हजार पार  

Corona Virus Pune News: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा नवा रेकॉर्ड; शनिवारी संख्या पोहचली दहा हजार पार  

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात दिवसागणिक नवा रेकॉर्ड करत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात कडक निर्बंध आणले आहेत. तसेच लसीकरणाच्या मोहिमेचा वेग देखील वाढवला आहे. परंतु, शनिवारी तरीदेखील जिल्ह्यात १० हजारांवर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

पुण्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली आहे. ही वाढ वर्षातली सर्वोच्च वाढ ठरत आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल ५ हजार ७२० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार ७४३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ८३७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.   
 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ७४३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४११ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 दिवसभरात एकूण ३ हजार ७४३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ८९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८३ हजार ८१९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २० हजार ६६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ३९ हजार ८५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus Pune News: Worrying! New record of corona outbreak in Pune district; On Saturday the number reached ten thousand