शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Corona virus :राज्यात पुणे जिल्हा बनतोय 'हॉटस्पॉट'; आकडेवारीतील घोळ अद्याप सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 12:05 IST

राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत

ठळक मुद्देऍक्टिव्ह रुग्णांमधील तफावत पुन्हा जैसे थे व जिल्ह्याच्या आकडेवारीत सुमारे 5 हजाराची तफावत आ

पुणे : राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारी मधील घोळ अजूनही सुरूच आहे. या घोळामुळे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णापाठोपाठ आता बाधितांची संख्याही राज्यात सर्वाधिक झाली. रविवारी राज्याच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकत 1 लाख 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अजूनही पुणे मुंबईपेक्षा मागेच आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभागाचा रविवारचा आकडा 1,25,197 हा आकडा आहे. त्यामुळे आता 'दादा, पालक म्हणून तरी यंत्रणेला जागे करा, आकड्यांचा घोळ थांबवा', असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आजही मोठी तफावत आढळून येत आहे. ही बाब लोकमत ने उजेडात आणल्यानंतर यंत्रणेला जाग आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आकड्यांचा घोळ सुधारण्याची सूचना केली. जिल्ह्याची 'स्मार्ट' यंत्रणा उघडी पडल्याने बदल करण्यास सुरुवात झाली. कोविड केअर सेंटर वर घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती भरली जात नसल्याचे लक्षात आले. पण हे बदल काही दिवसांचेच ठरले. आज पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. आता एकूण बाधित रुग्णांमध्येही पुणे राज्यात सर्वात पुढे गेल्याने पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.

राज्याचा अहवालानुसार, रविवारी पुण्यात सुमारे 1 लाख 30 हजार रुग्ण झाले. तर मुंबई मध्ये सुमारे 1 लाख 28 हजार एवढे रुग्ण आहेत. पुण्याने ठाणे जिल्ह्याला यापूर्वीच मागे टाकले आहे. आता मुंबई ही मागे पडली आहे. त्यामुळे देशपातळीवर पुण्याकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हॉटस्पॉट म्हणून बघितले जाणार आहे. वास्तविक जिल्हा आरोग्य विभागाकडील आकडेवारी नुसार पुणे अजूनही सुमारे 3 हजाराने मुंबईच्या मागे आहे. राज्य व जिल्ह्याच्या आकडेवारीत सुमारे 5 हजाराची तफावत आहे. सध्याचा पुण्यातील रुग्णवाढीचा वेग मुंबईपेक्षा अधिक असल्याने पुणे लवकरच मुंबईला मागे टाकेल, अशी स्थिती आहे. पण त्यापूर्वीच आकड्यांच्या घोळाने पुणे उभे गेले आहे.

---------------------------------- राज्य आरोग्य विभाग अहवालानुसार  एकूण बाधित         अ‍ॅक्टिव्ह पुणे- 1,30,606       41,020 मुंबई- 1,28,726     17,825 ठाणे। 1,13,944     20,288

---------------------------------------------

लोकमत चे प्रश्न -  राज्य अहवालातून ऍक्टिव्ह रुग्ण अचानक कमी झाले. ही चपळाई कुणाला दाखविण्यासाठी होती का? - 

ऍक्टिव्ह रुग्णांमधील तफावत पुन्हा जैसे थे झाली आहे. यंत्रणा पुन्हा कोलमडली आहे का? 

- बाधित रुग्णांचा आकडा राज्य अहवालात अधिक कसा? - 

- यंत्रणेकडून योग्य माहिती का दिली जात नाही? ----------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकरcommissionerआयुक्त