Corona virus Pune: दिलासादायक! पुणे शहरात शुक्रवारी ९७३ नवे कोरोनाबाधित; २ हजार ४९६ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:58 IST2021-05-21T19:57:51+5:302021-05-21T19:58:03+5:30
आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १३ हजार ४७९ वर आली आहे.

Corona virus Pune: दिलासादायक! पुणे शहरात शुक्रवारी ९७३ नवे कोरोनाबाधित; २ हजार ४९६ जणांची कोरोनावर मात
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आज दिवसभरात शहरात केवळ ९७३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.या आठवड्यात रूग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून,यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १३ हजार ४७९ वर आली आहे. आज दिवसभरात २ हजार ४९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात ११ हजार ६७६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजारांच्या पुढे आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत.
ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही आता शहरात पाच हजाराच्या आत आली असून, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार २७९ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर १ हजार ३१५ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २४ लाख १६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६४ हजार ७६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४२ हजार ६६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे.