शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Corona Virus Pune : पुण्यात नागरिकांकडून कोविड सेंटरलाच होतोय विरोध, आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 2:16 PM

गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याचे प्रकार घट आहे.

धनकवडी : शहरासह उपनगरात कोरोनाचा प्रकोप चालू आहे. प्रशासन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, लसीकरणाचा वेग आणि आवाका वाढवत आहे. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी अद्ययावत कोविड सेंटरची उभारणी केली जात आहे. मात्र काही ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या या सेंटरला नागरिकांकडून विरोध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्रिमूर्ती चौक परिसरातील एका वस्तीगृहामध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिक सुरू करत असलेल्या कोविड सेंटरला स्थानिक नागरिकांकडून होत असलेला विरोध होत आहे.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मागील दोन आठवड्यात महापालिका आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असले ल्या कोरोनाबाधितांना बेड्स उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन बेड शोधताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी रुग्णवाहिकेमध्येच चार पाच तास ताटकळत राहावे लागत आहे. अनेकदा ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांनी पँरामेडीकोज निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन करत आहेत. महापालिका विभागवार कोविड सेंटर उभारली जावेत यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी खासगी स्तरावर सेंटर उभारण्याचे धाडस काही खासगी व्यावसायिक करत आहेत.मात्र, याला होणारा विरोध अमानवी मानला जात आहे.

गेल्याच आठवड्यात आंबेगाव बुद्रुक येथे डॉक्टरांनी एकत्र येऊन एका कोविड सेंटरची उभारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या महापालिका प्रशासनाकडून घेत कोविड सेंटर सुरू करण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने कोविड सेंटर सुरू होऊ शकले नाही. दरम्यान त्रिमूर्ती चौक परिसरातील ईच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील खाजगी गर्ल्स हॉस्टेल इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू झाली आणि हे शेजारच्या सोसायटीतील नागरिकांना समजताच तेथील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. 

काही नागरिकांच्या विरोधामुळे गेल्या आठवड्यात ८० बेड व आता ४० बेड असे एकूण १२० बेड पासून नागरिक मुकले जाणार आहेत. धनकवडीमधील मुख्य चौकात, दाट लोकवस्तीमध्ये स्वाब तपासणी, लसीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी नियमित तपासणीसाठी वर्षभर वर्दळ सुरू आहे. 

कोरोनाबाधित झालेल्या कुटुंबाना होणारा त्रास आणि भविष्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता कोविड सेंटर उभारणी आवश्यक आहे. साथरोग प्रतिबंधक कायदाचा वापर करून महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीसांनी कोणी कोव्हिड सेंटर उभारत असेल तर त्यास सहकार्य करावे. साथरोगावर नियंत्रण मिळवायचे असेल तर प्रत्येक नागरिकांचे सर्वतोपरी सहकार्य असणे हे मानव जातीसाठी उपकारक ठरणार आहे. 

आप्पासाहेब रेणुसे - माजी नगरसेवक. 

......

कोविड सेंटरला विरोध ही दुर्दैवी बाब आहे. साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत. सर्व नियमांचे काटेकोर पालन झाल्यानंतर कोणी कोविड सेंटर सुरू करत असेल तर नागरिकांनी समजूतदारपणे दाखवत त्याला सहकार्य करावे.

- डॉ. दिपक पखाले - विभागीय वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Dhankawadiधनकवडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय