Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ४६७ कोरोनाबाधित तर ६५१ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 19:35 IST2021-06-02T19:35:25+5:302021-06-02T19:35:45+5:30
पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ३०५ इतकी आहे.

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ४६७ कोरोनाबाधित तर ६५१ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात बुधवारी नव्याने ४६७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ४८३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ६.२४ टक्के इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ३०५ इतकी आहे. दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १. ७६ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४२१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ७६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख १० हजार १८४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७० हजार ७७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५७ हजार १६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------