Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३१ नवे कोरोनाबाधित तर २५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 20:28 IST2021-07-08T20:24:45+5:302021-07-08T20:28:02+5:30
पुणे शहरात गुरूवारी खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ६ हजार ९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३१ नवे कोरोनाबाधित तर २५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात गुरूवारी दिवसभरात ३३१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ९४१ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ६ हजार ९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४४ रुग्ण गंभीर असून ४६१ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख १६ हजार ४५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८० हजार ९१३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६९ हजार ३३६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.