Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३२१ नवे कोरोनाबाधित तर ४३२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 22:10 IST2021-07-17T22:10:13+5:302021-07-17T22:10:35+5:30
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ८ हजार ५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३२१ नवे कोरोनाबाधित तर ४३२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३२१ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ९२६ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ८ हजार ५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३४ रुग्ण गंभीर असून ४८९ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ७८ हजार ६७४ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८३ हजार ५२० नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ७१ हजार ९०९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे.