Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३२० नवे कोरोनाबाधित तर ३०२ रुग्णांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 19:25 IST2021-07-10T19:24:56+5:302021-07-10T19:25:36+5:30
आत्तापर्यंत शहरातील तब्बल २७ लाख ३० हजार १६१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३२० नवे कोरोनाबाधित तर ३०२ रुग्णांची कोरोनावर मात
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात ३२० कोरोनाबाधित आढळून आले असून, ३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ३१ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ७ हजार २२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३१ रुग्ण गंभीर असून ४८६ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ३० हजार १६१ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८१ हजार ५४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६९ हजार ८६९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------