शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार २४३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 11:58 IST

पुणे शहरातील रुग्ण संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर

ठळक मुद्देजिल्ह्यात आता पर्यंत ५११ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू सोमवारी २३६ रुग्ण झाले बरे : एकूण २३० अत्यवस्थ, दिवसभरात १० जणांचा मृत्यू

पुणे : जिल्ह्यात सोमवारी (दि.15) रोजी एकाच दिवसांत तब्बल ३०३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर नव्याने ३१८ रुग्णांची भर पडली. यामुळे आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २४३ एवढी झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत तब्बल ७८२२ रुग्ण बरे देखील झाले आहेत. तर सोमवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण ५११ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. यामुळे गेल्या साडे तीन महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी जिल्ह्यात १२ हजारांचा पट्टा पार केला आहे. यात ८०टक्के रुग्ण एकट्या पुणे शहरामध्ये असून, पुणे आणि जिल्ह्यात संख्या अद्याप ही मर्यादित आहे असे म्हणावे लागेल. पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी १० हजारांचा तर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एक हजारांचा टप्पा पार केला आहे.----- शहरातील रुग्ण संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावरपुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला असून सोमवारी २३४ नवीन रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० झाला आहे.  दिवसभरात बरे झालेल्या २३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २३० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ९८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २३४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २३६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४५ रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ८६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ८९० झाली आहे.

....................................

पिंपरीत सोमवारी ६९ जण कोरोना पॉझिटिव्ह 

पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचे आणि अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही चांगले आहे. सोमवारी ६९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात ६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२४६ वर गेली आहे. २६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका दिवसात २९५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपळेगुरव येथील वृद्धांचा मृत्यू झाला आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सोमवारी दिवसभरात ६९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३९ पुरुष तर २८  महिलांचा समावेश आहे. 

एकूण बाधित रूग्ण : 12243पुणे शहर : 10021पिंपरी चिंचवड : 1177कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1045मृत्यु : 511बरे झालेले रुग्ण : 7922

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामshravan hardikarश्रावण हर्डिकर