Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ३१४ नवे कोरोनाबाधित तर २३१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:43 IST2021-07-09T20:43:10+5:302021-07-09T20:43:23+5:30
शहरातील तब्बल २७ लाख २२ हजार ९३५ जणांची तपासणी करण्यात आली.

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ३१४ नवे कोरोनाबाधित तर २३१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात ३१४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ६ हजार ८९० नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३६ रुग्ण गंभीर असून ४७९ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख २२ हजार ९३५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८१ हजार २२७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६९ हजार ५६७ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे.