Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३११ नवे कोरोनाबाधित तर ४५६ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:58 PM2021-06-09T20:58:16+5:302021-06-09T20:58:33+5:30

शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

Corona virus Pune: 311 new corona cases in Pune on Wednesday and 456 people recovered from corona | Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३११ नवे कोरोनाबाधित तर ४५६ जणांची कोरोनावर मात

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३११ नवे कोरोनाबाधित तर ४५६ जणांची कोरोनावर मात

Next

पुणे : शहरात बुधवारी ३११ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३ हजार ५३९ इतकी आहे. 

आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७५८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.६० टक्के इतकी आहे़ तर आज २३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ५६३ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ५५ हजार ५८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७३ हजार ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ६१ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत ८ हजार ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus Pune: 311 new corona cases in Pune on Wednesday and 456 people recovered from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app