Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 20:26 IST2021-07-29T20:26:01+5:302021-07-29T20:26:19+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५८९ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात
पुणे : शहरात गुरूवारी ३०४ कोरोनाबाधित आढळून आले असून, १९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७७५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़९० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५८९ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ६५ हजार ८६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ६६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.