Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:26 PM2021-07-28T20:26:32+5:302021-07-28T20:27:20+5:30

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे.

Corona virus Pune: 294 new corona patients in Pune on Wednesday; 347 patients recovered from corona | Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

Next

पुणे : शहरात बुधवारी २९४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९३० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़७० टक्के इतकी आढळून आली आहे. 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४८८ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ५८ हजार ९४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ३६५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार १२८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona virus Pune: 294 new corona patients in Pune on Wednesday; 347 patients recovered from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app