Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २६८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:49 IST2021-07-16T19:49:28+5:302021-07-16T19:49:49+5:30
शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४९८ इतकी आहे.

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २६८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात शुक्रवारी २८३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९५० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.५५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ४२ इतकी असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४९८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ७० हजार ६२२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८३ हजार १९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७१ हजार ४७७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे.