Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २७६ नवे कोरोना रुग्ण; ३१० जणांनी कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:04 IST2021-07-20T20:04:29+5:302021-07-20T20:04:53+5:30
शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९९ हजार १८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २७६ नवे कोरोना रुग्ण; ३१० जणांनी कोरोनावर मात
पुणे : शहरात मंगळवारी २७६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार १७८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.८४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८१५ इतकी असून, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आह़े. यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३८९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९९ हजार १८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ३५६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार ८३९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------