Corona virus Pune : पुणे शहरात २५० नवे कोरोनाबाधित : २२२ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:16 IST2021-07-23T22:16:46+5:302021-07-23T22:16:52+5:30
शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६१ इतकी

Corona virus Pune : पुणे शहरात २५० नवे कोरोनाबाधित : २२२ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात शुक्रवारी २५० कोरोनाबाधित आढळून आले असून, २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४०३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २. ९७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ३ हजार ३० असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख २५ हजार ७८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार २८५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७३ हजार ५३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७२० जणांचा मृत्यू झाला आहे.
--------