Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २४६ नवे कोरोनाबाधित तर ३५१ रुग्णांची मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:01 IST2021-06-15T22:01:04+5:302021-06-15T22:01:12+5:30
मंगळवारी ४८३ अत्यवस्थ, १० मृत्यू

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २४६ नवे कोरोनाबाधित तर ३५१ रुग्णांची मात
पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात २४६ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३५१ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ४८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ७७३ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ४९२ झाली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३५१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार २८० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७४ हजार ५४५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७७३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ७४८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ८६ हजार ९६२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.