Corona Virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २३९ कोरोनाबाधित तर ३६७ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 22:00 IST2021-06-11T21:59:53+5:302021-06-11T22:00:02+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७६ संशयितांची तपासणी करण्यात आली.

Corona Virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २३९ कोरोनाबाधित तर ३६७ कोरोनामुक्त
पुणे : शहरात शुक्रवारी २३९ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३६७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३ हजार ३२० इतकी आहे़
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.९३ टक्के इतकी आहे. तर आज २० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ९२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही ५१९ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २५ लाख ५६ हजार ४१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७३ हजार ५३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६१ हजार ७६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ४५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------