Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २२६ नवे रुग्ण तर ३३५ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 19:55 IST2021-06-26T19:55:31+5:302021-06-26T19:55:51+5:30
पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के : ५ जणांचा झाला दिवसभरात मृत्यू

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २२६ नवे रुग्ण तर ३३५ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ४०८ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.३ टक्के होती. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील शनिवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३०९ रुग्ण गंभीर असून ४३५ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ४६ हजार ४४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ३१० नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६६ हजार ३३७ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------