Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी २२६ नवे कोरोनाबाधित : १४२ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 20:06 IST2021-08-12T20:05:51+5:302021-08-12T20:06:21+5:30
शहरात आत्तापर्यंत २९ लाख ७७ हजार २८१ जणांची कोरोना तपासणी

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी २२६ नवे कोरोनाबाधित : १४२ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात गुरूवारी २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४८५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.३८ टक्के इतकी आढळून आली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार १२९ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ७७ हजार २८१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार ७३२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७८ हजार ७७१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८३२ जणांचा मृत्यू झाला आहे.