Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 22:37 IST2021-07-05T22:37:17+5:302021-07-05T22:37:55+5:30
पुणे शहरात आजपर्यंत तब्बल २६ लाख ९७ हजार ६९२ जणांची तपासणी करण्यात आली

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात
पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात १५० नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ६७९ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ४ हजार ८४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सोमवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९० रुग्ण गंभीर असून ४४८ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ९७ हजार ६९२ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७९ हजार ८८२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६८ हजार ५८६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे.