Corona Virus Pune : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १ हजार नवे ६९३ रुग्ण; ३ हजार ३३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:07 IST2021-05-15T20:06:58+5:302021-05-15T20:07:09+5:30
पुणे शहरात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा.....

Corona Virus Pune : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १ हजार नवे ६९३ रुग्ण; ३ हजार ३३ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ कमी झाली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी दिवसभरात १ हजार ६९३ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३ हजार ३३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४१३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २२ हजार ३०४ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४१३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ५ हजार ७२० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६५९ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ३३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख २८ हजार २३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५७ हजार ९८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २२ हजार ३०४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६ हजार ४०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २३ लाख ५२ हजार ६१९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.