शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:26 IST

चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

ठळक मुद्देफरासखानाच्या इमारतीत जवळपास ३०० पोलीस अधिकारी, कर्मचारी करतात काम संबंधित सर्वांचे वैद्यकीय तपासणी करून त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणारपिंपरीतील वायसीएममध्ये उपचार सुरु

पुणे : लोकांनी घरी रहावे, कोरोनापासून दूर रहावे, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी यांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात काम करणारा पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएममध्ये उपचार करण्यात येत आहेत. मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हा पोलीस कर्मचारी पोलिसांच्या व्हॅनवर चालक म्हणून काम करत होते. त्यामुळे गेल्या १५ दिवसात त्यांचा अनेकांशी संबंध आला होता. मध्य वस्तीतील पोलीस ठाण्याच्या इमारतीत जवळपास ३०० पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करतात. या शिवाय परिमंडळ १ मधील विविध पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी येथे येत असतात. त्यामुळे या पोलीस कर्मचार्‍याचा कोणाकोणाशी संपर्क आला. त्या सर्वाची माहिती घेतली जात आहे. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला अनेक दिवस ताप असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता़ सुदैवाने त्यांची तपासणी केल्यावर ती निगेटिव्ह आली होती........

चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत...चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्याच्या पत्नीचे रिपोर्टही शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. तर, शहरातील 54 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

पिंपरी चिंचवडमहापालिकेने 126 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा आले आहेत.  त्यात 42 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  त्याचबरोबर  एका 38 वर्षीय  महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही च-होली परिसरातील आहेत. त्यांना कोरोनाची कशी लागण झाली, कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. 

 दहा दिवसांत 33 नवीन रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. आज दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील दहा दिवसात तब्बल 33 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस