शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona virus : पुणे महापालिकेची मुख्यसभा यापुढे होणार 'व्हर्च्युअल' ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 16:31 IST

नागरिकांना मात्र सहभागी होता येणार नाही

ठळक मुद्देकेवळ महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव यांच्यासह अधिकारी उपस्थित

पुणे : महापालिकेची मुख्यसभा यापुढे 'व्हर्च्युअल' होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यसभेला गॅलरीमध्ये उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना मात्र सभेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने महापालिका, नगरपरिषदा / नगरपंचायती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषय समित्यांच्या नियतकालिक सभांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सुरक्षित अंतर व अनुषंगिक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या नियोजित सभा, बेठका घेणे बंधनकारक आहे. या सभा न झाल्यास लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती लागते. त्यामुळे या सभा घेणे आवश्यक असते. परंतु, पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्व बैठका, सभा या नियमितपणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्याव्यात असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे, पालिकेच्या मुख्यसभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. मुख्यसभेला नेहमी नागरिक गॅलरीमध्ये उपस्थित राहतात. यासोबतच सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही उपस्थित असतात. परंतु, यापुढे केवळ महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित राहू शकतील. नगरसेवक मात्र सभेला ऑनलाईन हजेरी लावू शकणार आहेत. गटनेते यांनाही सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाonlineऑनलाइन