शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

Corona virus : पुणे महापालिकेच्या रुग्णालयातील 'आॅक्सिजन’ अडकलाय निविदा प्रक्रियेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 11:44 IST

सिलेंडर अभावी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला

ठळक मुद्देदररोज 15 ते 20 रुग्णांना कमी जास्त प्रमाणात भासतेय ऑक्सिजनची गरज

पुणे : महापालिकेकडून नायडूसह महापालिकेतील अन्य रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलेंडर पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी नायडू रुग्णालयात सिलेंडर अभावी रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना या प्रक्रियेत एवढे दिवस का घालविले, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अत्यावश्यक बाब म्हणून नायडूला तातडीने सिलेंडर उपलब्ध करून देता आले असते.  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, नायडू रुग्णालयामध्ये सध्या १५५ रुग्ण असून त्यापैकी ७० रुग्ण आॅक्सिजनवर तर ७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच दररोज १५ ते २० वाढीव रुग्णांना कमी-अधिक प्रमाणात आॅक्सिजनची गरज भासते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नायडूतील आॅक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रत्यक्षात गरज आणि त्यातुलनेत आॅक्सिजन सिलिंडरची संख्या कमी असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असतो. तरीही महापालिका प्रशासनाकडून नायडूला अतिरिक्त सिलिंडर पुरविण्याऐवजी इतर रुग्णालयांचा भार टाकला जात आहे. तातडीने अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध करून देण्याऐवजी निविदा प्रक्रिया राबवून त्यामध्ये वेळ घालविला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे बंधन नसते. पण तरीही पालिका प्रशासनाकडून नायडूकडे दुर्लक्ष करून निविदा प्रक्रिया राबवून आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नेमण्याचा घाट घालण्यात आला. या प्रक्रियेला जवळपास १५ दिवस झाले आहेत. तसेच पुरवठादार नेमल्यानंतर त्याच्याकडून सिलिंडर मिळण्यास किमान आठवडाभर वेळ लागण्याची शक्यता आहे. एकीकडे दररोज बाधितांची संख्या तसेच गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेत १५ ते २० दिवस घालविले जात आहे. याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ------------------सिलेंडर पुरवठ्यासाठीचे पर्याय -- सध्याच्या निविदा प्रक्रियेअंतर्गत पुरवठादार नेमणे- सध्या नायडूला पुरवठा करणाºया पुरवठादाराकडून भाडेतत्वावर सिलेंडर घेणे- कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन सिलेंडर खरेदी करणे- नवीन सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत नायडूवरील बोपोडी व दळवी रुग्णालयाचा भार कमी करणे----------नायडूव्यतिरिक्त बोपोडी, दळवी, लायगुडे हॉस्पीटल, बालेवाडी यांसह काही कोविड सेंटरमध्ये एकुण किमान ५०० आॅक्सिजन बेडची सुविधा करण्याचे नियोजन आहे. निविदा प्रक्रियेतून एजन्सी निश्चित झाल्यानंतर आॅक्सिजन सिलिंडर पुरवठ्याची प्रक्रिया सुरळीतपणे होईल. तसेच नायडूलाही अतिरिक्त सिलिंडर देता येतील, असे महापालिकेतील आरोग्य अधिकायांनी सांगितले.---------------

 

 

-- 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका