पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी साडेआठ हजारांच्या पार गेला असून बुधवारी दिवसभरात तब्बल ३०४ रूग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५०९ झाली आहे. दिवसभरात बरे झालेल्या २७१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ५२८ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३०४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२७ तर खासगी रुग्णालयांमध्ये ६६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी ०३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४०६ झाली आहे. दिवसभरात एकूण २७१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २१० रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ५६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५७५ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ५२८ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १,९४९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६४ हजार ४४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १,७२८, ससून रुग्णालयात १५३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६४७ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : बाप रे ! पुण्यात दिवसभरात वाढले ३०४ कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५०९
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 21:10 IST
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१४ जणांची प्रकृती आहे चिंताजनक
Corona virus : बाप रे ! पुण्यात दिवसभरात वाढले ३०४ कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५०९
ठळक मुद्देबरे झालेले २७१ रुग्ण गेले घरी : दिवसभरात ०३ जणांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५७५