शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर; बाधितांची एकूण संख्या ११ हजार ४६५ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 22:44 IST

शुक्रवारी रुग्ण १५७ झाले बरे , कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सात हजार पार

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील २६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ४६५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६३ झाली आहे. विविध रुग्णालयातील २६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३ हजार ९०९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३५० पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२२ तर खासगी रुग्णालयांमध्ये ११८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २१२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४९३ झाली आहे. दिवसभरात एकूण १५७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११३ रुग्ण, ससूनमधील ०७ तर  खासगी रुग्णालयांमधील ३७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ७३ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ९०९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६७६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८४ हजार १८७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ६८६, ससून रुग्णालयात १२८ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १,०९५ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम