Corona virus : The number of corona patients in Baramati taluka has reached on 17 | Corona virus : बारामती तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली १७ वर

Corona virus : बारामती तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली १७ वर

ठळक मुद्देसिध्देश्वर निंबोडी बारामती आणि इंदापुुर तालुक्याच्या सीमेवर

बारामती : बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये भर पडली आहे. येथील रुग्णांची संख्या आता १७ वर पोहचली आहे. रविवारी (दि. ३१)तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील ६५ वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या १४ वर्षीय नातवाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. बारामतीत एकुण संख्या आता १७ वर जाउन पोहचली आहे. पुणे पोलीस दलातील कर्मचारी त्यांच्या मुळ गावी सिध्देश्वर निंबोडी(ता.बारामती) येथे आले होते.या ठिकाणी १७ मे रोजी ते आले होते,त्यानंतर १८ मे रोजी पहाटे पुन्हा पुणे पोलीस मुख्यालयात हजर झाले. मात्र, दोन तीन दिवसांनी त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कोरोना चाचणीत त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी(दि २९) या रुग्णाच्या हाय रीस्क संपर्कातील कुटुंबियांची बारामती येथे चाचणी घेण्यात आली.यामध्ये त्या रुग्णाचे आई वडील मुलासह पुतण्याचा समावेश होता.या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.रविवारी(दि ३१) या तपासणीचा अहवाल मिळाला.यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे वडील (वय ६५) तसेच मुलाला (वय १४) कोरोना संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ  खोमणे यांनी सांगितले.
सिध्देश्वर निंबोडी परिसर पूर्ण सील करण्यात आला  आहे .आसपासचे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आले आहे.शहरात कल्याणीनगर  श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत, कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत .
सिध्देश्वर निंबोडी बारामती तालु्क्याच्या शेवटच्या सीमेवर आहे. बारामती आणि इंदापुुर तालुक्याच्या सीमेवर आहे. येथील नागरीकांच्या चिंतेत भर पडली आहे.
——————————————————

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : The number of corona patients in Baramati taluka has reached on 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.