शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

Corona virus : आता होम क्वारंटाईन नाही; लक्षणे आढळली की थेट पालिकेचा विलगीकरण कक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 07:00 IST

आत्तापर्यंत सर्दी,खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन च्या सूचना देण्यात येत होत्या.

ठळक मुद्देआता या सील केलेल्या भागात आरोग्य सर्वेक्षणाचे काम अधिक जोमाने धोका टाळण्यासाठी कोरोना संशयित व्यक्तीस थेट कोविद केअर सेंटरमध्ये

नीलेश राऊत -पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे महापालिकेने शहरातील बहुतांशी भाग सील असून, प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणीचे काम हाती घेतले आहे. आजपर्यंत कोरोना आजाराशी संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीस हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्याच्या सूचना) च्या सूचना करण्यात येत होत्या. परंतू, गेल्या दोन तीन दिवसांतील कोरोनाबाधितांचा वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना संबंधित आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीची पालिकेच्या कोविद केअर सेंटर तसेच क्वारंटाईन कक्षात रवानगी करण्यात येणार आहे़.        कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वैद्यकीय पथकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्रारंभी याव्दारे सर्दी, खोकला, ताप आदी कोरोनाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला घरीच राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. दरम्यानच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. परिणामी हा सर्व मध्यवर्ती भाग सील केला गेला व त्यापाठोपाठ शहरातील अन्य २८ ठिकाणेही पूर्णपणे सील केली गेली आहेत. आता या सील केलेल्या भागात आरोग्य सर्वेक्षणाचे काम अधिक जोमाने करण्यात येत असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोना संशयित व्यक्तीस थेट पालिकेने शहराच्या विविध भागात सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये पालिकेच्या वाहनांमधून हलविण्यात येत आहे.     आत्तापर्यंत सर्दी,खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन च्या सूचना देण्यात येत होत्या. पण आता अशा प्रत्येक व्यक्तीची या कोव्हिड केअर सेंटरमध्ये (सीसीसी फ्ल्यू क्लिनिक) नेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रक्षकनगर क्रीडा संकुल (खराडी), लायगुडे दवाखाना (वडगाव धायरी), शिवरकर प्रसुतीगृह (वानवडी) कै़ मिनाताई ठाकरे प्रसुतीगृह (कोंढवा) व सणस मैदान होस्टेल येथे रवानगी करण्यात येणार आहे. येथे प्रत्येकाच्या घशातील स्त्रावाचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जोपर्यंत हे तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना येथेच ठेवण्यात येणार आहे. तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरच पुढील उपचाराच्या सूचना देऊन त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी केवळ सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रूग्णांचे उपचार करण्यात येणार आहे. या पाच सेंटरमध्ये ९५३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वरिल तपासणीत कोरोना आजाराशी साम्य असलेली मध्यम स्वरूपाची लक्षणे ज्या व्यक्तींना आढळून आली आहे अशा सर्व व्यक्तींना (डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर डीसीएचसी)  ससून सर्वोपचार रूग्णालयात औंध जिल्हा रूग्णालय, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल, डॉ़नायडू हॉस्पिटल या शासकीय व शासकीय पॅनेलवरील मान्यताप्राप्त  रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे. याच पाचही ठिकाणी ९५३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे़.      तसेच रूबी हॉल क्लिनिक, जहॉगिंर हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन, सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल हडपसर, सुर्या हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी, केईएम हॉस्पिटल अशा १० ठिकाणी हलविण्यात येणार आहे. यासर्व ठिकाणी कोरोना संशयित रूग्णांसाठी २७० स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, ६१ अतिदक्षता खाटा (आय़सी़यू) ची व्यवस्था करण्यात आली आहे.तर ससून सर्वोपचार रूग्णालय, सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे, भारती हॉस्पिटल (डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल डीसीएच) येथे तीव्र प्रकारची लक्षणे असलेल्या रूग्णांचे उपचार करण्यात येणार आहे. याठिकाणी ८५ अतिदक्षता खाटांची (आय़सी़यू) व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका