शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

चिंताजनक ! पुणे शहराचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ होईना कमी; राज्य व देशापेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 12:15 IST

१०० चाचण्यांमागे २३ जण बाधित

ठळक मुद्देराज्यात ‘पॉझिटिव्हिटी रेटचे प्रमाण सुमारे २० टक्के असून देशाचा ८ टक्क्यांपर्यंत खाली पॉझिटिव्हिटी रेट कमी करायचा असेल तर चाचण्या वाढविणे आवश्यक १ ते १४ सप्टेंबर या कालावधीत हा दर जवळपास ३० टक्क्यांवर

पुणे : शहरात रुग्णालय व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांचे प्रमाण म्हणजे ‘पॉझिटिव्हिटी रेट ’अजूनही २३ टक्क्यांच्या पुढे आहे. राज्यात हे प्रमाण सुमारे २० टक्के असून देशाचा दर जवळपास ८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पण मागील आठवडाभरात शहराचा हा दर किंचितपणे कमी होताना दिसत आहे.         नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांमध्येही सातत्य राहिलेले नाही. दैनंदिन चाचण्यांची संख्या मागील १५ दिवसांत कमी झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत दररोज सरासरी ६ हजारांहून अधिक चाचण्या होत होत्या. त्यामुळे सध्या नवीन रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी पॉझिटिव्हिटी रेट जवळपास स्थिर राहिल्याचे चित्र आहे. शनिवारपर्यंत १०० चाचण्यांमागे २३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत होते. जुलै महिन्यात हे प्रमाण १५ एवढे होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात हा आकडा २० च्या पुढे गेला.           दि. १ ते १४ सप्टेंबर या कालावधीतत झालेल्या एकुण चाचण्यांच्या तुलनेत हा दर जवळपास ३० टक्क्यांवर पोहचला होता. पण त्यानंतर मागील हे प्रमाण कमी होत गेल्याचे दिसते. तर दि. ३ ऑक्टोबरपर्यंत हा दर जवळपास २३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पण हा दर कमी होण्याचे प्रमाण सध्या खुप कमी आहे. राज्यातील हे प्रमाण सध्या २० टक्क्यांवर असले तरी मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. तर देश पातळीवर हे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. पुण्याप्रमाणेच यामध्ये हळुहळू घट होत चालली आहे.-----------------शहरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण (टक्केवारी)दिवस              एकुण चाचण्या         एकुण बाधित           बाधित प्रमाण३ ऑक्टोबर         ६,४३,०२०                 १,४८,४०६               २३.०७१५ सप्टेंबर          ५,४२,९४६                 १,२२,४४८               २२.५५१ सप्टेंबर            ४,५७,८०६                 ९७,०६८                  २१.२०१५ ऑगस्ट         ३,५४,१०२                 ७२,५७६                   २०.४९१ ऑगस्ट           २,७९,२५५                ५५,७६१                    १९.९६१४ जुलै             १,७१,७७२                 २९,१०७                   १६.९४१ जुलै               १,२०,०५८                 १८,१०५                   १५.००---------------------------------------------------------दि. ३ ऑक्टोबरची स्थितीशहर  - २३.०७ टक्केराज्य - २०.३३ टक्केदेश - ८.३२ टक्के-------------------पॉझिटिव्हिटी रेट कमी करायचा असेल तर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. हा दर ५ टक्क्यांच्या खाली आला तर ही साथ नियंत्रणात आली, असे आपण म्हणू शकतो. सध्या नवीन रुग्ण कमी आढळून येत असले तरी त्यांच्यामुळे इतर अनेकांना संसर्ग होत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे व सुपरस्प्रेडरच्या चाचण्या अधिक वाढवायला हव्यात.- डॉ. स्नेहल शेकटकर, शास्त्रज्ञ, सेंटर फॉर मॉडलींग अँड सिम्युलेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टु कोविड---------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवार