महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा; नववर्षापासून एकही ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ नसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 21:12 IST2020-12-31T21:03:13+5:302020-12-31T21:12:20+5:30
ज्या भागात कोरोनाबाधित अधिक आहेत, त्या भागात महापालिकेने ‘प्रतिबंधित क्षेत्र’ जाहिर करून ते सील करण्याचे धोरण स्विकारले होते..

महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा; नववर्षापासून एकही ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ नसणार
पुणे : कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अधिक असलेल्या भागात महापालिकेकडून जाहिर करण्यात आलेले सद्यस्थितीचे ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटन्मेंट झोन) ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून रद्द करण्यात आले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे नववर्षात पुणे शहरात आता कोरोनाबाधितांचा भाग म्हणून ओळखला जाणारा एकही कंटेन्मेंट झोन असणार नाही. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी दिले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी व त्या बाधितांपासून इतरांना संसर्ग होऊ नये, या उद्देशाने ज्या भागात कोरोनाबाधित अधिक आहेत, त्या भागात महापालिकेने ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ जाहिर करून ते सील करण्याचे धोरण स्विकारले होते. यानुसार सप्टेंबर महिन्यात पुण्यात शंभर सव्वाशेपर्यंत पोहचलेले ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या व संसर्ग कमी झाल्याने डिसेंबर महिन्यात ६ वर आले होते़
गुरूवारी ही क्षेत्रेही महापालिकेने निरंक केले असून, गरज पडल्यास विशिष्ट इमारत, सोसायटी येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक आढळल्यास संबंधित क्षेत्राचे अधिकारी तो भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहिर करू शकतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सदर क्षेत्र निरंक झाली असली तरी, कंटन्मेट झोनबाबत केंद, राज्य व महापालिकेने निर्गमित केलेले आदेश शहरात लागू राहणार आहेत.
------------------------------------