Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ ; ३४९ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:10 IST2020-12-30T20:10:32+5:302020-12-30T20:10:43+5:30
शहरात आजपर्यंत ९ लाख १३ हजार ३७६ जणांची कोरोना तपासणी

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ ; ३४९ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३४९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ हजार २३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २४२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १४५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६४९ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ५१४ इतकी आहेत. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून,यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६२६ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख १३ हजार ३७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७८ हजार ५४० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७० हजार ४०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.