Corona Virus News : 963 new corona affected in Pune on Saturday; 672 patients were cured | Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी तब्बल ९६३ नवे कोरोनाबाधित; ६७२ रुग्ण झाले बरे 

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी तब्बल ९६३ नवे कोरोनाबाधित; ६७२ रुग्ण झाले बरे 

ठळक मुद्दे आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार १

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शनिवारी दिवसभरात ९६३ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३२१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ४६० झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६७२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८८५ झाली आहे. दिवसभरात एकूण ६५९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार १ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार ३४६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ६ हजार ४६० झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ६०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ११ लाख ८५ हजार २५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus News : 963 new corona affected in Pune on Saturday; 672 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.