Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ९०४ नवे कोरोनाबाधित; ५६२ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 19:36 IST2021-03-04T19:36:37+5:302021-03-04T19:36:50+5:30
पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५८५ जणांची तपासणी...

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ९०४ नवे कोरोनाबाधित; ५६२ रुग्ण झाले बरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची वाढ सुरूच आहे. गुरुवारी शहरात दिवसभरात तब्बल ९०४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, अनेक जण खासगी प्रयोगशाळांमधून तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत.
पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५८५ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ११.९१ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ५ हजार ८८६ इतकी झाली असून, दिवसभरात ५६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६३१ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही इतकी आहे.
शहरात आजपर्यंत ११ लाख ७० हजार ३८३ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ५ हजार ५५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९४ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे.