Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:56 PM2021-03-08T19:56:58+5:302021-03-08T19:57:23+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Corona Virus News: 753 new corona virus inffected in Pune on Monday; 700 people were cured | Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे

Next
ठळक मुद्देप्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ७३५

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून आजचा रुग्णांचा आकडाही काहीसा दिलासादायक आहे. सोमवारी दिवसभरात ७५३  रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ७३५ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६९० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८९७ झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 दिवसभरात एकूण ७००  रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार ७५१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ९ हजार ८३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ६ हजार ७३५ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ५३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ११ लाख ९८ हजार ५३६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus News: 753 new corona virus inffected in Pune on Monday; 700 people were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.