Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 21:33 IST2020-12-02T21:33:40+5:302020-12-02T21:33:50+5:30
शहरात आजपर्यंत ८ लाख २६ हजार ४०२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
पुणे : शहरात बुधवारी ३४७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३४५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.आज दिवसभरात ४ हजार १५० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, आजची पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८.३६ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४०८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १४९ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३९४ इतकी आहे़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ४ जण पुण्याबाहेरील आहे.शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४७१ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ८ लाख २६ हजार ४०२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७० हजार ६९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६० हजार ८३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
==========================