Corona Virus News : 328 corona infestations in Pune on Monday; 318 people were freed from corona | Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी शहरात ३२८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३१८ जण झाले कोरोनामुक्त

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी शहरात ३२८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३१८ जण झाले कोरोनामुक्त

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असताना, रविवारी ६३४ वर गेलेला नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी निम्म्याच्या आसपास म्हणजेच ३२८ वर आली आहे. शहरासाठी हे दिलासादायक चित्र असले तरी कोरोना संशयितांचे प्रमाण चार हजाराच्या पुढे गेले आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ४ हजार ४१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ३२८ जण पॉझिटिव्ह आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ७़४३ टक्के इतकी आहे. शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या आजमितीला ३७९ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १७२ इतकी आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३१८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९०२ इतकी झाली आहे. 

शहरात आजपर्यंत ११ लाख ०३ हजार ५४८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९८ हजार २९२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ५६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus News : 328 corona infestations in Pune on Monday; 318 people were freed from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.